इंडिया आघाडीच्या ट्विटने उडवली भाजपवाल्यांची झोप; पाहा काय आहे ट्विट

India Alliance Tweet l लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागला आहे. यामध्ये NDA ला 293 जागा मिळाल्या आहेत तर इंडिया आघाडीला 234 लागा मिळाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर आता दिल्लीत अनेक खलबत सुरु आहे. अशातच निकालानंतर देशातील नागरिकांचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे आहे.

दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग :

लोकसभा निवडणुकीनंतर आता दिल्लीतील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. एकीकडे एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देखील दिला आहे. मोदींनी राजीनामा दिल्यानंतर आता सत्तास्थापन करण्याचा दावा केला जात आहे. अशातच लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याचं सूत्रांकडून समजत आहेत.

दुसरीकडे इंडिया आघाडीने 234 जागांवर विजय मिळवून देशातल्या इतर पक्षांना थेट खुलं निमंत्रण दिल आहे. संविधानावर विश्वास असणाऱ्या पक्षांनी इंडिया आघाडीत सहभागी व्हावं असं आवाहन देखील काँग्रेस अध्यक्षांनी केलं आहे. या सर्व राजकीय उलाढालीनंतर इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

India Alliance Tweet l इंडिया आघाडीचं ट्विट चर्चेत :

इंडिया आघाडीच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट केलं आहे. त्यामध्ये लिहाल आहे की, “Game Not Over Wait” . आता या ट्वीटमुळे देशभरात चांगलीच चर्चा सुरू आहेत. आता देशातील जनतेला सत्तासंघर्ष पाहायला मिळणार का? भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इंडिया आघाडीचा हा नवा डाव असणार का? असे अनेक प्रश्न सध्या चर्चेत आहेत.

इंडिया आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी एक बैठक घेतली होती. या बैठीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्रकारांशी संपर्क सांधला. ते म्हणाले की, “इंडिया अलायन्स योग्य वेळेची वाट तर पाहणार आहे. आम्ही देखील एकजुटीने निवडणूक लढवली आणि पूर्ण ताकदीने लढलो आहे. मोदींच्या जनमताला नकार देण्याचा आमचा हा प्रयत्न असणार आहे.

News Title : India Alliance Viral Tweet

महत्त्वाच्या बातम्या

या राशीच्या व्यक्तींना आर्थिक धनलाभ संभवतो

अभिनेता शशांक केतकर यांची पोस्ट चर्चेत, म्हणाला…

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार?; ‘इतके’ आमदार शरद पवारांकडे परतणार?

“माझ्या मुलाला मारण्यासाठी त्यांनी..”; निलेश लंकेंच्या आईच्या आरोपांनी खळबळ

चिन्हामुळे झाला घोळ; शशिकांत शिंदेंच्या पराभवाचं कारण समोर