भारत आणि पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात एकत्र यावं-चीन

नवी दिल्ली | भारत आणि पाकिस्ताननं दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी एकत्र यावं, अशी भूमिका चीननं घेतली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही भूमिका मांडली आहे.

भारताचे विंग कमांडर अभिनंदन यांची सूटका करण्याच्या पाकिस्तानच्या निर्णयाचं चीननं स्वागत केलं आहे.

दोन्ही देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकून राहण्यासाठी वाटाघाटी आणि बातचीत होणं, आवश्यक आहे, असं देखील चीनच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अभिनंदन यांना आज भारताकडं सोपवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

अमोल कोल्हेंचा शिवसेनेला जय महाराष्ट्र! राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश

पुलवामाच्या घटनेचा निषेध न करणाऱ्यांवर आम्ही विश्वास कसा ठेवायचा?- अमित शहा

…म्हणून पुलवामाच्या शहीद कुटुंबानं मानले अक्षय कुमारचे आभार

-सर्वसामान्यांच्या जीवावर निवडणूक लढवणार- सुजय विखे

इस्लाम म्हणजे शांतता, ‘अल्लाह’च्या 99 नावातही हिंसाचार नाही- सुषमा स्वराज