Top News

गूड न्यूज! भारताकडून सीरमच्या कोविशिल्ड लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी

पुणे | भारतीयांना नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गूड न्यूज मिळाली आहे. ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीने विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळालीये. पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे.

मंगळवारी ब्रिटनने ऑक्सफर्डच्या लसीला मान्यता देण्यात आली. यानंतर आता भारतातही लसीला मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील परवानगी ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाच्या विशेष समितीकडून घेण्यात आलीये.

कोविशिल्डने तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. या चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती.

सीरमने आतापर्यंत लसीचे 5 कोटी डोज तयार केले आहेत. सीरमचे सीईओ अदर पुनावालांच्या म्हणण्याप्रमाणे, ही लस सरकारला 200 ते 250 रुपयांपर्यंत मिळू शकते.

थोडक्यात बातम्या-

“अजितदादा, एक तर तुम्ही माझ्या घरी या किंवा मी तुमच्या घरी येतो”

लता मंगेशकर यांचं ठाकरे कुटुंबाला उद्देशून ट्विट; ट्विटमध्ये म्हणतात…

सोनमची कपूरची बातच न्यारी! हटके अंदाजात दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा

#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या