बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहिद आफ्रिदी म्हणतो, भारत वर्ल्डकपचा प्रबळ दावेदार…

लाहोर |  इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत हे चारही संघ फॉर्मात आहेत. परंतू भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार आहे, असं मत पाकिस्तानचा माजी खेळाडू शाहिद आफ्रिदी याने व्यक्त केलं आहे.

शाहिद आफ्रिदी याने एका युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने भारताचा संघ तुफान फॉर्ममध्ये आहे, त्यांच्यात जेतेपद पटकवण्याची ताकद असल्याचं म्हटलं आहे.

पूर्वी भारताकडे गोलंदाजांची कमतरता होती. आता मात्र कुलदीप यादव, युजवेंद्र चहल नवखे असूनही अनुभवी गोलंदाजांसारखे गोलंदाजी करतात, अशी स्तुती आफ्रिदीने केली आहे.

दरम्यान, यंदाच्या विश्वचषकात भारताने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू शोएब अख्तर याने पाकिस्तानच्या कर्णधारावर टीका केली होती, त्याला बिनडोक कर्णधार असं संबोधलं होतं.

महत्वाच्या बातम्या

-विधानसभेच्या अगोदर भाजप काढणार रथयात्रा; ‘फिर एक बार शिवशाही सरकार’

-विनोद तावडे म्हणतात, धर्माच्या आधारे आरक्षण देता येणार नाही…

-पीकविमा कंपन्यांनी धंदा मांडून ठेवलाय; शेतकऱी प्रश्नावरून बच्चू कडू गरजले

-मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांशी बोललो आहे, दुसऱ्यांनी नाक खुपसू नये- उद्धव ठाकरे

-या तारखेच्या दरम्यान विधानसभा निवडणूक होईल; चंद्रकांत पाटलांचा अंदाज

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More