बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विराट बॉम्ब फुटणार! न्यूझीलंडविरुद्ध ‘हे’ जागतिक विक्रम करण्याची विराट कोहलीला संधी

मुंबई | टी-20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघाने न्यूझीलंड आणि भारताचा पराभव केला आहे. उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी आज भारत- न्यूझीलंडला आजचा सामना करो किंवा मरो असाच आहे. त्यामुळे दोन्ही संघ पूर्ण ताकदीनिशी सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.  मात्र या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीला विक्रमाचा पाऊस पाडण्याची संधी चालून आलेली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विराट कोहलीवर सगळ्यांचं लक्ष्य लागून आहे.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने न्यूझीलंडविरूद्ध 51 धावा केल्यामुळे त्याने विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये विराट कोहलीने 13 अर्धशतक झळकावले आहे. त्यामुळे जर विराट कोहलीने पुन्हा या सामन्यात अर्धशतक झळकावले. तर तो बाबरला मागे टाकू शकतो.

विराट कोहलीने आतापर्यंत कर्णधार असताना 46 टी-20 सामन्यांमध्ये 27 सामने जिंकले आहेत. जर आजचा सामना जिंकला तर तो डॅरेन सॅमीला मागे टाकून सर्वाधिक सामने जिंकणारा जगातील पाचवा कर्णधार ठरेल. तसेच विराटने 91 सामन्यांमध्ये 91 षटकार ठाकले आहेत. आजच्या सामन्यात 9 षटकार ठोकले तर तो षटकारांचा शतक पूर्ण करेल आणि अशी कामगिरी करणारा कोहली आठवा आणि भारताचा दुसरा खेळाडू ठरेल. तर रोहित शर्माच्या नावावर 133 षटकार आहेत.

दरम्यान, पाकिस्तानने मानहाणीकारक पराभव केल्यामुळे भारताला आजचा सामना खुप महत्वाचा ठरणार आहे. कारण या सामन्यांतून उपांत्य फेरीतील गणितं निश्चित होऊ शकणार आहे. त्यामुळे भारताला आजचा सामना जिंकणे आवश्यक आहे.

थोडक्यात बातम्या- 

आदित्य ठाकरेंना पर्यावरण खातं कसं मिळालं? बाळासाहेब थोरातांनी सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाले…

अनेक स्वप्न पाहता, देव बुडवून बसले, आमची आघाडी मात्र भक्कम- बाळासाहेब थोरात

प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना कोरोनाची लागण

इंदिरा गांधींना माहित होतं की त्यांची हत्या होऊ शकते, तरीही…; प्रियंका गांधीचं मोठं वक्तव्य

नवाजुद्दीन सिद्दीकीने ‘या’ कारणामुळे सोडला ओटीटी प्लॅटफॉर्म; चाहत्यांना बसला मोठा धक्का

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More