बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद; संख्या वाढण्याची भीती

नवी दिल्ली | भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भात ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने माहिती दिली आहे.

भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. त्यानंतर राजधानी दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत, तिन्ही दलांचे प्रमुख आणि परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांच्यासमवेत बैठक घेतली. राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचं कळतंय.

दरम्यान, लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

सरकार गेलं, पदही गेलं…. भाजप नेत्या चित्रा वाघ यांची ‘या’ पदावरील नियुक्ती रद्द

“काँग्रेसच्या लाचारीचं मला आश्चर्य वाटतंय, एवढी लाचारी मी कधीच पाहिली नव्हती”

महत्वाच्या बातम्या-

‘….तर हे असं झालंच नसतं’; क्रिती सेनॉनची इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

पुण्यात आज 150 रूग्णांना डिस्चार्ज, पाहा किती रूग्ण वाढले…

“कोरोना भारतात येण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More