बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या दीड लाखांच्या आत

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपुर्ण देशभरात गेल्या 2 महिन्यांपासुन हाहाकार माजला आहे. वाढत्या रुग्णसंख्येंमुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

काल देशभरात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. देशात काल दिवसभरात 1 लाख 32 हजार 788 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तब्बल 2 लाख 31 हजार 456 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 24 तासात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसुन येत आहे.

देशात काल दिवसभरात 3 हजार 207 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  आतापर्यंत देशात 3 लाख 35 हजार 102 कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. तसेच सध्या 17 लाख 93 हजार 645 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

संपुर्ण देशभरात लसीकरण मोेहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून आतापर्यंंत 21 कोटी 85 लाख 46 हजार 667 नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोनारूग्णांचा आकडा असाच कमी होत राहीला तर भारत लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

“आमचा ‘राजा’ तुमच्या राजासारखा खोटं बोलत नाही”; गडकरींचा जुना व्हिडीओ शेअर करत मनसेचं उत्तर

महाराष्ट्राच्या ‘या’ शहरातील पालिकेची 11 कोविड सेंटर होणार बंद; रुग्णसंख्या घटल्याने प्रशासनाचा निर्णय

… आणि त्या निर्णयामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; प्रवासी संख्या घटल्याने पुणे विभागातील ‘या’ रेल्वे गाड्या राहणार बंद

राज्यातील 12वी बोर्डाची परीक्षा रद्द होणार?; शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचं सुचक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More