बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशाची चिंता वाढली! नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ, पाहा आकडेवारी

नवी दिल्ली |  देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरश: हाहाकार माजवला असल्याचं दिसून आलं. त्यातच आता देशात डेल्टा प्लस या विषाणूच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसात भारतातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत होती. पण आता हा आकडा वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे.

काल देशभरात तब्बल 43 हजार 071 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच 52 हजार 299 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असताना अचानक आकडा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. काल देशभरात 955 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, आतापर्यंत 04 लाख 02 हजार 5 नागरिकांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. तसेच सध्या 04 लाख 85 हजार 350 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भारतातील एकूण रुग्ण संख्या ही 03 कोटी 05 लाख 45 हजार 433 वर पोहोचली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 35 कोटी 12 लाख 21 हजार 306 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशभरात लसीकरण मोहीम मोठ्याप्रमाणात वेग घेत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे आता कोरोना आटोक्यात येणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More