बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 60 हजारात, मृतांचा आकडाही घटला

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 60,753 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 97 हजार 743 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 1647 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 85 हजार 137 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 07 लाख 60 हजार 019 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 98 लाख 23 हजार 546 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 27 कोटी 23 लाख 88 हजार 783 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

पप्पा म्हणाले “केसांचा कोंबडा छान दिसतोय”, पाहा प्राजक्ता माळीची वेगळीच हेअरस्टाईल

सोन्याच्या दरात सलग तिसऱ्या दिवशी मोठी घसरण; वाचा आजचे दर

मोफत ‘शिवभोजन’ थाळीच्या मुदतीत केली वाढ; मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

सावधान! फिरायला जाणाऱ्यांना आता 15 दिवस होम क्वारंटाईन करणार; अजित पवारांचा दणका

5 मिनिटांत टोचवली दोन वेगळ्या कंपनीची लस; हलगर्जीपणामुळे अशी झाली महिलेची अवस्था

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More