बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

नवी दिल्ली | देशभरात गेल्या दीड वर्षापासून कोरोनाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर काहींना आपला संसार उध्वस्त होताना पाहावं लागलं. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली आणि आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं.

देशातील वाढणारी रुग्णसंख्या हळु हळू आटोक्यात येत असल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच गेल्या 3-4 दिवसांपासून देशातील रुग्णसंख्या वाढत आहे. दररोज वाढणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कालही 50 हजारांच्या पुढे असल्याचं आढळून आलं त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

मागच्या 24 तासात देशभरात 51,667 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून 1 हजार 329 जणांचा कोरोनामुळे दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सध्या देशभरात 6 लाख 12 हजार 868 सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातच आता भारतात नव्या व्हेरीएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने भीतीचं वातावरण पसरलं आहे.

भारतात आतापर्यंत 3 कोटी 01 लाख 34 हजार 445 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच दररोज कमी होत असलेली रुग्ण संख्या अचानक गेल्या काही दिवसात वाढायला लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच भारतात आतापर्यंत 3 लाख 93 हजार 310 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ फेम करण मेहराच्या अडचणीत वाढ!

…तर मी राजकीय संन्यास घेईल- देवेंद्र फडणवीस

“सरकार प्रत्येक गोष्टीत मोदींकडे बोट दाखवतं, बायकांनी मारलं तरी ते मोदीजींनी केलं म्हणतील”

लग्न चालू असताना सहाव्या फेऱ्यानंतर ती थांबली अन् म्हणाली….

संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचा, हे ज्याला कळतं तोच खरा नेता- उद्धव ठाकरे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More