बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 70 हजारात, पाहा आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 70,421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 1 लाख 19 हजार 501 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 3921 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 74 हजार 305 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 09 लाख 73 हजार 158 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 25 कोटी 48 लाख 49 हजार 301 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

नाना पटोलेंच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तलावात 500च्या नोटा तरंगताना दिसल्या, नंतर झालं असं काही की…

फेसबुक लाईव्ह करत रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोवर शेतकऱ्याचा गंभीर आरोप, पाहा व्हिडीओ

मोठी बातमी! उदयनराजे आणि संभाजीराजेंची होणार पुण्यात भेट ‘या’ विषयावर होणार चर्चा

“कोल्हापूरकरांनो, निर्बंध लादण्याची आम्हाला हौस नाही, थोडं सोसा”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More