बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

नवी दिल्ली | देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

गेल्या 24 तासात भारतात 16 हजार 326 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 666 रुग्णांना प्राण गमवावे लागले. देशभरात सध्या 1 लाख 73 हजार 728 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात साडेचार लाखांपेक्षाही अधिक जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत भारताने लसीकरणात 100 कोटींचा टप्पा पार करत लसीकरणामध्ये नवा विक्रम नोंद केला आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं”

‘मी हे खपवून घेणार नाही’; क्रांती रेडकर कडाडली

ऐन दिवाळीच्या तोंडावर ST बसेस राहणार बंद?, वाचा नेमकं कारण काय?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, सर्व पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द

देशात का होतेय डिझेलवर चालणाऱ्या वाहनांच्या संख्येत घट?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More