बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या 50 हजारांच्या खाली, पाहा आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

काल देशात 46,148 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 58 हजार 578 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 979 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 96 हजार 730 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 05 लाख 72 हजार 994 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 03 कोटी 02 लाख 79 हजार 331 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. त्यात आता नवा डेल्टा प्लस व्हायरस आल्याने अजून चिंतेत भर पडली आहे.

थोडक्यात बातम्या –

“20 टक्के लसीकरण झालेल्या देशात कोरोनाची तिसरी लाट नाहीच”

डेल्टा प्लस व्हेरिएंटचा सर्वाधिक धोका महाराष्ट्रालाच का?; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती

‘बिग बाॅस’ फेम अभिनेत्री हीना पांचाळला अटक!

“सरसकट अपमानास्पद वक्तव्यासाठी अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करू शकत नाही”

“आरक्षणासाठी ओबीसी समाजाचे मंत्री एकत्र येतात अन् मराठा मंत्री केवळ बघ्याची भूमिका घेतात”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More