बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धोका वाढला! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांमध्ये वाढ, जाणुन घ्या आकडेवारी

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं.

देशात गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांमध्ये घट होत असल्याचं पाहायला मिळत होतं. पण गेल्या 24 तासात देशात तब्बल 3 लाख 62 हजार 727 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला  मिळालं, 24 तासात एकुण 4 हजार 120 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 3 लाख 52 हजार 181 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 37 लाख 10 हजार 525 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा आधीच पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात कडक लाॅकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह दिल्लीमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 1 हजार 931 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होणार की अशीच रूग्णसंख्या वाढत जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या –

लग्नानंतर पाचच तासात नवरीला मृत्यूनं गाठलं, नवरदेवानं दिला मुखाग्नी

“देशातील बहुतांश भागात सहा ते आठ आठवड्यांचा लॅाकडाऊन लावण्यात यावा”

“कोरोनापासून संरक्षण मिळवण्यासाठी लसीचा तिसरा डोसही घ्यावा लागेल”

काळ्या बुरशीचा धोका वाढला; मास्क वापरताना ‘या’ गोष्टी करणं पडू शकतं महागात!

एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांची बदली रद्द; मॅटकडून मोठा निर्णय

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More