देशातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट, पण मृतांचा आकडा वाढला
नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. पण आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येत आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. 24 तासात 2 लाख 22 हजार 315 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 4 हजार 454 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 3,02,544 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 27 लाख 20 हजार 716 सक्रिय रूग्णसंख्या आहे.
भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा आधीच पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन 1 जुन पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा, असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 709 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
1 जूननंतर महाराष्ट्रातील एवढे जिल्हे वगळून लॉकडाऊन उघडणार?; या मंत्र्याचं सूचक वक्तव्य
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजेंची महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात; आज ‘या’ ठिकाणी देणार भेट
‘तेरी मिट्टी में मिल जावां…’; कोरोना योद्ध्यांसाठी जवानाने वाजवली मनमोहक धून, पाहा व्हिडीओ
ब्राह्मण समाजातील एक वर्ग मोठ्या प्रमाणात गरीब, म्हणून भाजपने… – चंद्रकांत पाटील
अल्पवयीन मुलीवर दोन महिने बलात्कार; पीडिता गरोदर राहिल्यानंतर समोर आला धक्कादायक प्रकार
Comments are closed.