बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट,पाहा आकडेवारी

नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. पण आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येत आहे.

देशात गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचं  पाहायला मिळालं. 24 तासात 2 लाख 11 हजार 298 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 847 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 2 लाख 83 हजार 135 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 24 लाख 19 हजार 907 सक्रिय रूग्णसंख्या आहे.

भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 3 लाखांचा टप्पा पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन 1 जुन पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा, असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात आहे. काल दिवसभरात पुण्यातुन काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं,  काल दिवसभरात 683 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘या’ अभिनेत्रीचा आपल्या आजीसोबतचा डान्स सोशल मीडियावर होतोय तूफान व्हायरल, पाहा व्हिडीओ

शरीरसंबंध ठेवण्यास पत्नीने दिला नकार, पतीने पत्नीवर गोळ्या झाडून त्यानंतर केला ‘हा’ धक्कादायक प्रकार

“लाॅकडाऊन आपल्याला हळुहळु उघडावा लागेल, लगेचच सर्व काही उघडणार नाही”

बापरे! मानवी वस्तीमध्ये आला ‘हा’ भला मोठा प्राणी…, पाहा व्हिडीओ

लग्नात मंत्र म्हणता म्हणता ब्राह्मण दमला; रिकाम्यावेळात नवरा-नवरीने केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More