शनिवारी देशातील कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट, बरे हाेणाऱ्यांची संख्या नव्या रूग्णांपेक्षा 1 लाखाने अधिक
नवी दिल्ली | देशभरात सध्या कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आता अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा लाॅकडाऊन घोषित करण्यात आला आहे. प्रशासनाकडून निर्बंध अधिक कडक करण्यात येऊन देखील, रूग्ण संख्येतील वाढ सुरूच आहे. देशातील दरदिवशी वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीने अमेरिकेलाही मागे टाकलं होतं. पण आता काही प्रमाणात दिलासादायक चित्र समोर येत आहे.
देशात गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. 24 तासात 2 लाख 40 हजार 842 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून, मृत पावणाऱ्यांची संख्या काही प्रमाणात अधिक असल्याचं पाहायला मिळालं, 24 तासात एकुण 3 हजार 741 रूग्णांचा देशात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने देशात मृत्यू दरही झपाट्याने वाढत असल्याचं दिसून येत आहे. मागच्या 24 तासात देशात 3,55,102 रुग्ण कोरोनातुन बरे झाले आहेत. त्याचबरोबर, सध्या भारतात एकूण 28 लाख 05 हजार 399 सक्रिय रूग्णसंख्या आहे.
भारतात कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांच्या संख्येने 2 लाखांचा टप्पा आधीच पार केला आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून बैठका घेऊन कोरोना रोखण्यासाठी कठोर पावले उचलत अखेर राज्यात लाॅकडाऊन घोषित केला, त्यानंतर आता महाराष्ट्रात लाॅकडाऊन 1 जुन पर्यंत वाढवण्यात आला आहे. पण केंद्र सरकारने लाॅकडाऊन हा शेवटचा पर्याय म्हणुन वापरण्यात यावा, असा सल्ला राज्यांना दिला आहे. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्येही लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
संपुर्ण देशासह पुण्यातही कोरोनानं मोठ्या प्रमाणात थैमान घातलं असल्याचं दिसून येत आहे. देशातील सर्वाधिक रूग्णसंख्या ही एकट्या पुण्यात असल्याचं स्पष्ट झालं होतं. पण आता आकडा आटोक्यात येत आहे. काल दिवसभरात पुण्यातुनही काही प्रमाणात दिलासादायक चित्र पाहायला मिळालं, दिवसभरात 840 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याचं प्रशासनाकडुन स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे आता लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.
थोडक्यात बातम्या –
पुण्यात लग्नाचं आमिष दाखवून वर्ग मित्राकडून तरूणीवर अडीच वर्षे बलात्कार
पुण्यातील खळबळजनक घटना; शेजारीण चार्जर घेण्यासाठी गेली अन्…
लहान मुलांना कोरोनापासून कसं रोखायचं?; उद्धव ठाकरेंनी दिला ‘हा’ महत्वाचा सल्ला
मॉर्निंग वॉकला गेलेल्या नागरिकांवर पोलिसांची कारवाई; अँटीजन चाचणीनंतर धक्कादायक माहिती समोर
Comments are closed.