Top News आरोग्य कोरोना देश

कोरोनाचा धुमाकूळ… देशात गेल्या तासांत तब्बल एवढे हजार कोरोना रूग्ण

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा धुमाकूळ सुरूच आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दरदिवशी 50 हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून येत आहे. आजही हा शिरस्ता कायम राहिला आहे. गेल्या 24 तासांत 52 हजार 972 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

भारतातली कोरोनाबाधितांची एकूण संख्या आतापर्यंत 18 लाख 03 हजार 696 इतकी झाली आहे. तर गेल्या 24 तासांत दुर्दैवाने 771 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, अशी माहिती केंद्रिय आरोग्य विभागाने दिली आहे.

देशात सध्या 5 लाख 79 हजार 357 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 11 लाख 86 हजार 203 रूग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. दिलासादायक गोष्ट म्हणजे भारताचा रिकव्हरी रेट सुधारून आता तो 63 टक्क्यांच्या वरती गेला आहे.

 

 

देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचा प्रकोप आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 509 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर सध्या 1 लाख 48 हजार 537 रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

मैं हूँ ना…. चिंता करू नकोस, राज ठाकरेंचा अविनाथ जाधवांना खास निरोप

लॉकडाऊनमध्ये रॉयल एनफील्डची कमाल, ग्राहकांच्या पसंतीला बुलेटची धमाल…!

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नीचं मुंबईत निधन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या