बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशात एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद; नव्या बाधितांची संख्या 1 लाखांच्या आत

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. काल देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडुन स्पष्ट करण्यात आलं आहे.

काल देशातील नव्या कोरोनाबाधितांची आकडेवारी एक लाखांच्या आत आल्याचं स्पष्ट झालं. 24 तासात अवघ्या 94 हजार 052 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात रूग्णसंख्या आटोक्यात येत असताना पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर 24 तासात 1 लाख 51 हजार 367 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 6148 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. एका दिवसात सर्वाधिक मृतांची नोंद काल झाली आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 59 हजार 676 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 11 लाख 67 हजार 952 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 91 लाख 83 हजार 121 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 23 कोटी 90 लाख 58 हजार 360 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या

लॉकडाऊनमुळे ‘हा’ अभिनेता झाला बेरोजगार; पैशांसाठी विकावी लागली आवडती बाईक

हे सरकार नुसतं टिकणारच नाही तर पाच वर्षे टिकेल- शरद पवार

नवीन नेतृत्व तयार झालंय, राष्ट्रवादीच्या भविष्याची चिंता नाही- शरद पवार

शाहु-फुले-आंबेडकर विचारांनीच महाराष्ट्र चालेल- अजित पवार

“…म्हणून भाजपला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More