बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सकारात्मक बातमी! रविवारी देशात सर्वात कमी नव्या कोरोनाबाधितांची नोंद

नवी दिल्ली | देशात गेल्या दोन महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्ण संख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्ण संख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. रविवारी देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

रविवारी देशात 1 लाख 636 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील ही सर्वात कमी रुग्णांची नोंद असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर रविवारी 1 लाख 74 हजार 399 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 2427 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 03 लाख 49 हजार 186 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 14 लाख 01 हजार 609 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 2 कोटी 89 लाख 09 हजार 975 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. भारतात 23 कोटी 27 लाख 86 हजार 482 नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या –

“‘ब्लू टीक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्या”

‘आम्हाला हनीमूनला जाण्यासाठी ई-पास हवाय!’

पुण्यात अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्या ‘या’ हॉटेलवर पोलिसांची धाड; तब्बल 41 जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक! व्हिडीओ बनवण्याच्या नादात स्वतःलाच पेटवून घेतलं

‘नाथाभाऊंनी राष्ट्रवादीत गेल्यावर तरी खरं बोलावं’; चंद्रकांत पाटलांचा खडसेंना टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More