बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

नवी दिल्ली | गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण आता कोरुना रुग्ण संख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंधांमधून नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.

मागच्या 24 तासात देशभरात 12 हजार 514 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 12 हजार 718 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान सध्या देशभरात 1 लाख 58 हजार 817 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 251 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 04 लाख 58 हजार 437 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावा असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

नवाब मलिकांच्या जावयाच्या अटक प्रकरणातील मुख्य आरोपीचा मोठा खुलासा, म्हणाला तो गांजा…

“आर्यन खानसोबत जे काही घडलं त्याचं एक आई म्हणून वाईट वाटतं”

इकडे क्रांती रेडकर चिंतेत तर दुसरीकडे आठवलेंच्या कवितांची गाडी सुसाट

एकीकडे सर्वसामान्यांचं दिवाळं तर दुसरीकडे इंधन विक्रीतून केंद्र सरकारची दिवाळी

‘तीन लोकांनी आमच्या घराची रेकी केली’, क्रांती रेडकरांचा गंभीर आरोप

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More