बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येतील चढउतार सुरूच, पाहा गेल्या 24 तासातील आकडेवारी

नवी दिल्ली | गेल्या जवळपास दोन वर्षांपासून कोरोना महामारीने संपूर्ण जगभरात थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतामध्ये लॉकडाऊनसह अनेक कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. पण आता कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे निर्बंधांमधून नागरिकांना शिथिलता देण्यात आली आहे.

मागच्या 24 तासात देशभरात 10 हजार 229 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 11 हजार 926 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान सध्या देशभरात 1 लाख 34 हजार 096 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 125 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 04 लाख 63 हजार 655 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

“बाळासाहेबांची शिवसेना आणि आताच्या शिवसेनेत जमीन आस्मानचा फरक”

“नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तिला…”, ‘या’ मंत्र्याची कंगनाविरोधात रोखठोक भूमिका

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या निधनाने गडकरी हळहळले, म्हणाले…

…तर इतर सर्व महामंडळातील कर्मचारीही विलीनीकरणाची मागणी करतील

लोणावळ्याच्या तन्वी बंगल्यात पोलीस पोहोचले अन् समोर जे दिसलं ते पाहून हादरले

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More