बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट पण मृतांच्या आकड्यात वाढ, वाचा आकडेवारी

नवी दिल्ली | देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत चढउतार सुरूच आहे.

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 348 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 805 रुग्णांना प्राण गमवावे लागले. काल दिवसभरात देशात 13 हजार 198 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. देशभरात सध्या 1 लाख 61 हजार 334 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात 04 लाख 57 हजार 191 जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती. पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. देशाने लसीकरणात नवा विक्रम नोंद करत आतापर्यंत 104 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय

“लाडक्या आर्यनला बेल मिळाला, आता जनतेच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेणार का?”

एकनाथ शिंदे यांना कुटूंबासह जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More