बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येत घट, पाहा गेल्या 24 तासातील दिलासादायक आकडेवारी

नवी दिल्ली | देशातील कोरोना रूग्णसंख्येत गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. तसेच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशात वेगानं लसीकरण सुरु करण्यात आलं. यामुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. अशातच देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत चढउतार सुरूच असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. त्यात गेल्या 24 तासात देशातील सक्रीय बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या 24 तासात भारतात 14 हजार 306 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 443 रुग्णांना प्राण गमवावे लागले. देशभरात सध्या 1 लाख 67 हजार 695 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत देशभरात साडेचार लाखांपेक्षाही अधिक जणांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत होती पण आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, भारतात लसीकरण मोहिम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. आतापर्यंत भारताने लसीकरणात 100 कोटींचा टप्पा पार करत लसीकरणामध्ये नवा विक्रम नोंद केला आहे. तसेच लसीकरण मोहीम संपुर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या

“ठाकरे सरकारला जरा जरी लाज असेल तर…”

तुम्ही पिताय तो चहा भेसळयुक्त चहा पावडरपासुन तर बनवलेला नाही ना?, असं ओळखा

T-20 World cup: पाकिस्तानी पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नावर भडकला कोहली, म्हणाला…

‘या’ पाच गोष्टी ठरल्या भारताच्या पराभवासाठी कारणीभूत

धक्कादायक! ‘फ्रेंड्स’ वेबसिरीजमधील ‘या’ प्रसिद्ध कलाकाराचं दु:खद निधन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More