बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील कोरोना रूग्णसंख्येत चढउतार सुरूच; 7 महिन्यातील सर्वात कमी बाधितांची संख्या

नवी दिल्ली | संपुर्ण जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता देशातील कोरोना रूग्णसंख्येत मात्र चढउतार सुरूच असल्याचं दिसून आहे. मागच्या 7 महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी करण्यात आली पण आता यात काही प्रमाणात वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या काही महिन्यांंमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत होती परंतू, आता तीच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काल देशात 18,833 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 24 हजार 770 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 278 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 04 लाख 49 हजार 538 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 02 लाख 46 हजार 687 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यात आता तिसऱ्या लाटेचा धोका व्यक्त केला जात असल्याने अजून चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत भारतात 92 कोटी 17 लाख 65 हजार 405 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींचा पुन्हा भडका, सर्वसामान्य नागरिक त्रस्त

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

“तालिबानी सरकार आणि योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”

‘आता मंत्रालयातसुद्धा जायची वेळ झाली’, मनसेच्या मुख्यमंत्र्यांना चारोळीतून कोपरखळ्या

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More