बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी- देशाच्या कोरोना रुग्णसंख्येबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती जाहीर

नवी दिल्ली | देशातील कोरोनाबाधितांची संख्या गेल्या काही महिन्यात सतत वाढत असताना आता हळूहळू हि रुग्णसंख्या आटोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या घट होत आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासातील देशातील कोरोनाबाधितांची आकडेवारीही दिलासा देणारी आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 9 हजार 283 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 10 हजार 949 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच देशातील कोरोनामुक्तीचा दर हा 98.30 टक्क्यांवर आला आहे.

दरम्यान, सध्या देशभरात 1 लाख 11 हजार 481 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याचबरोबर मागच्या 24 तासात 437 कोरोनाबाधित रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. आतापर्यंत 04 लाख 66 हजार 584 कोरोनाबाधित रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत.

देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून भारताने 100 कोटींचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच सर्व नागरिकांनी लसीकरण मोहिमेत सहभाग नोंदवत लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्यावं, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या

कोरोनानं टेंशन वाढवलं; WHO कडून ‘ही’ धक्कादायक माहिती समोर

वादग्रस्त कृषी कायदे रद्द होणार?, आज होणार अंतिम निर्णय

‘अर्ध्यावरती डाव मोडला, अधूरी ड्रग्जची कहाणी’, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आज तोडगा निघणार?, 11 वाजता होणार महत्त्वाची बैठक

नवाब मलिकांच्या अडचणींत वाढ; ‘त्या’ चॅटवरुन क्रांती रेडकरची पोलिसात धाव

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More