बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील सक्रिय कोरोना रूग्णसंख्येत 205 दिवसातील निच्चांकी नोंद

नवी दिल्ली | देशात काही महिन्यांपुर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच हळूहळू देशातील रुग्णसंख्या ही आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र आता पाहायला मिळत आहे. मागच्या 24 तासात देशातील नव्या कोरोना रुग्णसंख्येत घट झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

मागच्या 24 तासात देशात 21 हजार 257 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 24 हजार 963 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

देशातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असतानाच हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागच्या 24 तासात देशभरात 271 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 04 लाख 50 हजार 127 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 02 लाख 40 हजार 221 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हा आकडा मागच्या 205 दिवसातील सर्वात कमी आकडा असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. भारतात तब्बल 93 कोटी 17 लाख 17 हजार 191 नागरिकांचं कोरोना लसीकरण पूर्ण झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

काय सांगता! गॅस सिलेंडर बुकींगवर चक्क मिळतंय सोनं

सोलापूर महानगरपालिका निवडणूक कुणाच्या नेतृत्वात लढणार?

भारतीय जवानांची चीनवर कुरघोडी,चीनी सैनिकांचा ‘हा’ डाव उधळला

चक्क शिवसेना आमदाराने हक्काच्या घरासाठी केला म्हाडाकडे अर्ज, वाचा सविस्तर

मास्क न वापरणाऱ्यांनो सावधान; आता भरावा लागणार एवढ्या रुपयांचा दंड!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More