बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत 9 महिन्यानंतर मोठी घट

नवी दिल्ली | संपूर्ण देशभरात गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने अक्षरशः थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच हळूहळू कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. त्यानुसार आरोग्य मंत्रालयाने गेल्या 24 तासातील कोरोनाबाधितांची आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतात गेल्या 24 तासात 8 हजार 865 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून तब्बल 11 हजार 971 जण कोरोनावर मात करत कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत असल्याचं दिसून येत आहे. तसेच झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात आली आहे.

गेल्या 24 तासात देशभरात 197 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सध्या 01 लाख 30 हजार 793 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 9 महिन्यानंतर कोरोना रुग्णसंख्या 10 हजारांच्या आत आल्याचं पाहायला मिळत आहे.

संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असून आतापर्यंत लसीकरणानेही विक्रमी टप्पा ओलांडला आहे. देशभरात 112 कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

थोडक्यात बातम्या

वायु प्रदुषणाच्या समस्येवरून केंद्र सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! संरक्षण सचिव, गृहसचिव आणि आयबी प्रमुखांच्या कार्यकाळातही बदल

सकाळी-सकाळी नवाब मलिकांनी केलेल्या ट्विटने उडाली एकच खळबळ

एनसीबीची मोठी कारवाई! 1127 किलो गांजा ‘या’ ठिकाणाहून केला जप्त

एकीकडे संप सुरू, तर दुसरीकडे 6800 कर्मचारी कामावर परतले?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More