बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताची कोरोनामुक्तीकडे आगेकुच; कोरोना रूग्णसंख्येत लक्षणीय घट

नवी दिल्ली | कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत भारतात परिस्थिती काही अंशी नियंत्रणात येताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार हळुहळु कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 62,224 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 75 दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या सोमवारी नोंदवली गेली आहे. तर काल दिवसभरात मृतांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 2542 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.

काल दिवसभरात देशात 1 लाख 07 हजार 628 कोरोनाबाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली आहे. समाधानाची बाब म्हणजे कोरोनातून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही झपाट्याने वाढत आहे.

देशात सलग आठवडाभर कोरोना विषाणूमुळं संक्रमित झालेले रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अधिक आहे. देशातील कोरोना रिकव्हरी रेट 95 टक्क्यांहून जास्त झाला आहे. सक्रिय रुग्णसंख्येचं प्रमाण 4 टक्क्यांपर्यंत कमी झालं आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर एकूण बाधितांच्या बाबतीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे.

थोडक्यात बातम्या-

‘दोन डोसमधील अंतर वाढवण्याची शिफारस केलीच नव्हती’; ‘या’ शास्त्रज्ञांचा खळबळजनक दावा

कोट्यवधींच्या साखरेचं पावसाने मोठं नुकसान; तब्बल 30 हजार पोते भिजले

“ओबीसी समाजाला न्याय मिळत नसेल, तर ओबीसी कल्याण मंत्रालय बरखास्त करा”

आनंदाची बातमी! मुंबईतील कोरोना आटोक्यात; सक्रिय रूग्णांसह नव्या बाधितांच्या संख्येत घट

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटबद्दल ‘ही’ दिलासादायक माहिती आली समोर

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More