बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने संपुर्ण देशभरात गेल्या 2 महिन्यांपासुन हाहाकार माजला आहे. वाढत्या रुग्णसंख्येंमुळे आरोग्य यंत्रणेवरही मोठ्या प्रमाणात ताण येत असल्याचं भयावह चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासुन वाढत असलेली कोरोना रूग्णसंख्या आता आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

काल देशभरात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळालं. देशात काल दिवसभरात 1 लाख 52 हजार 734 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली असून तब्बल 2 लाख 38 हजार 022 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तसेच 24 तासात कोरोनामुळे मृत होणाऱ्यांचा आकडाही काही प्रमाणात कमी झाल्याचं दिसुन येत आहे.

देशात काल दिवसभरात 3 हजार 128 कोरोनाबाधितांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.  आतापर्यंत देशात 3 लाख 29 हजार 100 कोरोनाबाधितांच्या मृत्युची नोंद झाली आहे. तसेच सध्या 20 लाख 26 हजार 092 सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासुन कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत असल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे.

संपुर्ण देशभरात लसीकरण मोेहीम मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आली असून आतापर्यंंत 21 कोटी 31 लाख 54 हजार 129 नागरिकांना कोरोना लस देण्यात आल्याचं केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. कोरोनारूग्णांचा आकडा असाच कमी होत राहीला तर भारत लवकरच कोरोनामुक्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या –

वाढदिवसाला आई-वडिलांनी दिलेलं गिफ्ट पाहून मुलीलाही बसला धक्का, पाहा व्हिडीओ

कुऱ्हाडीने वार करत एकुलत्या एक मुलाने घेतला बापाचा जीव, धक्कादायक कारण आलं समोर

काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटणार?; 25 आमदार दिल्लीत दाखल

अकोल्यात शासकीय निवासस्थानी घडला धक्कादायक प्रकार; सरकारी कर्मचाऱ्याची हत्या करून….

काय सांगता! चक्क चिमणी करतीये स्केटिंग, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More