बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सावधान! देशात कोरोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय; वाचा चिंताजनक आकडेवारी

नवी दिल्ली | देशात गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः हाहाकार माजवलेला पाहायला मिळत होता. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशातील कोरोनाबाधित रुग्ण बरे होत असल्याचं दिलासादायक चित्र देखील पाहायला मिळालं. त्यातच आता कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूने डोकं वर काढलं असतानाच काल देशात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

देशभरात काल 41 हजार 649 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळूहळू कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीय कमी होत असल्याचं दिसून येत असतानाच आता रूग्णसंख्या वाढल्याने चिंतेत भर पडली आहे. त्याचबरोबर काल 37 हजार 291 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

काल देशभरात 593 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आत्तापर्यंत देशभरात 4 लाख 23 हजार 810 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे. देशभरात सध्या 4 लाख 08 हजार 920 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तसेच आतापर्यंत 3 कोटी 07 लाख 81 हजार 263 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. भारतात 46 कोटींहुन अधिक नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. तसेच लसीकरणात जागतिक पातळीवर भारताने विक्रम नोंदविला आहे आणि देशातील सर्वाधिक लसीकरण हे महाराष्ट्रात करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

थोडक्यात बातम्या –

“मराठवाड्यात दररोज 1 लाख जणांना कोरोनाची बाधा होईल”

श्रद्धा कपूरची ‘ती’ खास चॅट होतेय सोशल मीडियावर व्हायरल, पाहा फोटो!

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल!

…तेव्हा कोरोना महामारी नष्ट होईल- WHO

‘देव तारी त्याला कोण मारी’; भलं मोठं झाड कोसळलं पण…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More