नवी दिल्ली | भारताचा यष्टीरक्षक पार्थिव पटेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली आहे. बुधवारी पार्थिवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
पार्थिवने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याचा हा निर्णय जाहीर केलाय. पार्थिव त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, “गेल्या 18 वर्षांपासून क्रिकेट विश्वात सुरु असलेला प्रवास मी आता थांबवतोय. मी घेतलेला हा निर्णय सांगताना माझं मन भरून आलंय. यावेळी मी अनेकांचा ऋणी आहे.”
“एका 17 वर्षांच्या मुलाला टीम इंडियामध्ये स्थान देण्याचा विश्वास दाखवलाय. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयने दिलेल्या पाठिंब्याबद्दल तसंच मार्गदर्शनाबद्दल आभारी असल्याचं,” पार्थिव पटेलने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
पार्थिवने 2002 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेलं. त्यावेळी पार्थिव पटेल हा भारताकडून कसोटी खेळणारा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरला होता.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाबाधित रुग्णाच्या घराबाहेर पोस्टर्स लावू नका- सर्वोच्च न्यायालय
कोरोनानंतर भारतात आलाय रहस्यमय आजार; आकडी येऊन बेशुद्ध पडत आहेत लोक
‘राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक तरी माहित आहे का?’; मुख्यमंत्र्यांची टीका
कोथरुडच्या सोसायटीत शिरला गवा; गवगवा झाल्यावर पुणेकरांची तोबा गर्दी!
धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीची हॉटेलच्या रूममध्ये आत्महत्या
Comments are closed.