बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही, देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला”

लखनऊ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 2018 साली गुंतवणूकदारांसोबत चर्चा केली होती. त्यानंतर गुंतवणूकदारांनी उत्तर प्रदेशात मोठी गुंतवणूक केली आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी तिसऱ्या गुंतवणूकदार शिखर परिषदेस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. या पंतप्रवेळीधानांनी देशातील विकासकामे आणि पद्धतींवर भाष्य केलं आहे.

जगात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातही भारतासाठी मोठ्या संधी आहेत. आज जग ज्या विश्वासार्ह भागीदाराची अपेक्षा करत आहे ती पुर्ण करण्याची ताकद फक्त आपल्या लोकशाही भारतामध्ये आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. जगात भारताची क्षमता दिसत असून भारताच्या कामगिरीचं कौतुक होत आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या काळातही भारत थांबला नाही तर देशाने आपल्या सुधारणांचा वेग वाढवला आहे. भारत जी20 अर्थव्यवस्थांमध्ये सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म हा मंत्र पुढे घेऊन चालत आहोत, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देशाने अनेक वस्तुंची निर्यात करून विक्रम केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं.

दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी उपस्थित गुंतवणूकदारांना काशीला जाण्याचा आग्रह केला. काशी बदलेली आहे, काशीचा विकास झालेला आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या- 

विधान परिषदेच्या उमेदवारी संदर्भात पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

“मी आता वयाच्या 85 व्या वर्षात आंदोलन करायचं का?”

काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…

महाविकास आघाडीत नाराजीचा सूर; ‘या’ नेत्याचे शिवसेनेवर गंभीर आरोप

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More