बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जर्मनीत नाझींनी ज्यू बरोबर जे केलं तेच मोदी आता भारतातील मुस्लिमांसोबत करत आहेत- इमरान खान

नवी दिल्ली | कोविडच्या फसलेल्या धोरणावरून लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकार मुस्लिमांना जाणीपूर्वक, हिंसक पद्धतीने लक्ष्य करत आहे. जर्मनीत नाझींनी ज्यू बरोबर जे केले तेच भारतात सुरु आहे. ज्यामुळे हजारो लोक उपाशी राहत आहेत, असे आरोप इम्रान खान यांनी भारतावर केले आहेत.

भारतात जाणीवपूर्वक मुस्लिमांना लक्ष्य केलं जातयं हा पाकिस्ताानच्या सर्वोच्च नेतृत्वाचा आरोप भारताने फेटाळून लावला आहे. पाकिस्तानला आपले अंतर्गत विषय हाताळता येत नाहीयत, त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानकडून मुद्दामून असे आरोप केले जात आहेत, असं भारतानं म्हटलं आहे.

पाकिस्तानला आपले अंतर्गत विषय हाताळता येत नाहीयत. त्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानी नेतृत्वाकडून अशी विचित्र वक्तव्य केली जात आहेत. कोरोनाच्या विरोधात लढण्यावर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी ते शेजाऱ्यांवर असे निराधार आरोप करत आहेत, असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्यांकांचा आवाज दडपला जात असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. पाकिस्तानात अल्पसंख्यांकांना भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते. त्यामुळे त्यांनी आपल्या देशातील अल्पसंख्यांकांना भेडसावणाऱ्या चिंतांवर लक्ष केंद्रीत केले पाहिजे असंही श्रीवास्तव यांनी म्हटलं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

‘संतांची, वीरांची भूमी नाही तर …’; पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?; जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम

 

महत्वाच्या बातम्या-

…तर एकट्या मुंबईत 50 हजार लोकांना कोरोनाची लागण होईल- डॉ. तात्याराव लहाने

राज्यपाल हे घटनात्मक पद, दबाव कशाला आणता? शेलारांचा राऊतांना अप्रत्यक्ष सवाल

आपण काय करतो याचं भान भाजप नेत्यांनी सोडू नये; गृहराज्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More