‘भारतातील ९० टक्के लोकांकडे…’; ब्लूम व्हेंचर्सच्या अहवालातून धक्कादायक आकडेवारी समोर

India Economy 90 percent Indians Lack Disposable Income 

India Economy | ब्लूम व्हेंचर्सच्या (Bloom Ventures) ‘इंडस व्हॅली वार्षिक अहवाल २०२५’ नुसार, भारतातील श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, तर गरीब अधिक गरीब होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, देशातील तब्बल ९० टक्के लोकांकडे, म्हणजेच सुमारे १०० कोटी लोकांकडे, दैनंदिन गरजा भागवण्याव्यतिरिक्त खर्च करण्यासाठी पैसे शिल्लक नाहीत. (India Economy)

बहुसंख्य लोकसंख्येकडे बचतीसाठी पैसे नाहीत

बहुसंख्य भारतीय लोकसंख्येची आर्थिक स्थिती बिकट असल्याचे या अहवालात म्हटले आहे. ते महिन्याचा खर्च कसाबसा भागवत असून, पगारातील सर्व पैसे खर्च होऊन जातात. त्यामुळे त्यांच्याकडे बचतीसाठी पैसे शिल्लक राहत नाहीत, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, भारतातील फक्त १० टक्के लोक देशात खर्च करत आहेत आणि आर्थिक वाढीस हातभार लावत आहेत.

ग्राहक वर्ग कमी होतोय

खर्च करणाऱ्या या १० टक्के लोकांची संख्या अंदाजे १३ ते १४ कोटी आहे, जी मेक्सिकोच्या (Mexico) एकूण लोकसंख्येएवढी आहे. धक्कादायक बाब म्हणजे, भारतातील ग्राहक वर्ग विस्तारण्याऐवजी कमी होत चालला आहे. (India Economy)

सुमारे ३० कोटी लोक खर्च करण्याची इच्छा व्यक्त करतात, मात्र प्रत्यक्षात खरेदी करण्यास ते कचरतात, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Title : India Economy 90 percent Indians Lack Disposable Income 

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .