बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देशातुन कोरोना लवकरच हद्दपार होणार?, 8 महिन्यातील सर्वात कमी कोरोना रूग्णांची नोंद

नवी दिल्ली | संपुर्ण जगभरात गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच आता देशातील कोरोना रूग्णसंख्येत मात्र चढउतार सुरूच असल्याचं दिसून आहे. मागच्या 8 महिन्यातील सर्वात कमी रुग्णसंख्येची नोंद सोमवारी करण्यात आली आहे. असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

गेल्या काही महिन्यांंमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत होती. परंतू, आता तिच रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. काल देशात 12,428 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात हळुहळु कमी कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर काल 15,951 कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आपल्या घरी परतले आहेत.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आता हळूहळू कोरोना आटोक्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. काल देशभरात 365 कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत देशभरात 04 लाख 55 हजार 068 जणांना कोरोनामुळे आपला प्राण गमवावा लागला आहे.

देशभरात सध्या 01 लाख 63 हजार 816 सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. भारतात लसीकरण मोहीमही मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. त्यात आता नव्या म्युटेशनचा धोका व्यक्त केला जात असल्याने अजून चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंत भारतात 100 कोटींहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

आर्यन खानच्या जामीन याचिकेवर आज होणार सुनावणी

फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांच्या अडचणी वाढणार?, तपास यंत्रणेकडे सबळ पुरावे!

महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अध्यक्षांविना?, महाविकास आघाडीला ‘या’ गोष्टीची भीती

“…तोपर्यंत समीर वानखेडे यांनी राजीनामा द्वावा”

एनसीबीमधील ‘Special-26’चा खुलासा होणार; नवाब मलिक लवकरच करणार नवा गौप्यस्फोट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More