मुंबई | रविवारी रात्री 9 वाजता 9 मिनिटे घरातील लाइट्स बंद करून दिवे लावावे किंवा मोबाइल बॅटरी सुरू करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी संपूर्ण देशाला केलं होतं.
मोदींच्या या आवाहनाला रविवारी रात्री 9 वाजता देशवासीयांना उत्तम प्रतिसाद दिला. घराघरात दिवे पेटले होते. अनेकांनी मोबाइलचे फ्लॅशलाइट्स सुरू केलं होतं.
अनेक ठिकाणी लोकांना यासाठी घरातील मेणबत्त्या काढून ठेवल्या होत्या. जिथे थोड्याफार प्रमाणात दुकाने सुरू होते तेथे दिवाळीच्या पणत्या विकायला आल्या होत्या.
रात्री 9 वाजेपासून अनेक घरांमध्ये दिव्यांची आरास दिसत होती. नियमित लाइट्स बंद ठेवून जनतेने मोदींच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला होता.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाविरोधी लढ्यासाठी मोदी सरकारचा नवा प्लॅन!
पुण्यात 24 तासात कोरोनाचा तीसरा बळी; मृतांची संख्या पाचवर
महत्वाच्या बातम्या-
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई नाही, जादा दराने विकणार्यांना शासनाचा कारवाईचा इशारा
“तबलिगीच्या कार्यक्रमामुळे देशात कोरोना संसर्गाचा वेग दुप्पट झाला”
Comments are closed.