बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारतात श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण झाली’; नाना पटोलेंचं भाजपवर टीकास्त्र

नागपूर | महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाकडून राज्यस्तरीय नवसंकल्प शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बोलताना भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एकसंघ समाजनिर्मितीचे स्वप्न पूर्ण करू, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

हल्ली सोशल मीडियाचा वापर करून समाज तोडण्याचे काम भाजपद्वारे सुरू आहे. देशाची एकात्मता भंग करण्याचा प्रयत्न भाजपा करत आहे. नागरिकांची दिशाभूल करायची आणि आपसात भांडणे लावून सत्ता उपभोगायची हाच अजेंडा गोदी मीडियाचा आहे, अशी जोरदार टीका नाना पटोलेंनी केली आहे.

भाजपच्या अपप्रचाराला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसचा सोशल मीडिया विभाग सज्ज झाला आहे. आम्ही सर्वांना सोबत घेऊन ही लढाई लढणार आहोत, असं नाना पटोले म्हणाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सोशल मीडिया निर्णायक भूमिका बजावणार आहे, असं नाना पटोलेंनी सांगितलं आहे.

दरम्यान, भाजपकडून सोशल मीडियाचा वापर करत देशाची वास्तविकता लपवली जात आहे. श्रीलंकेची जशी परिस्थिती झाली तशी परिस्थिती भारतात निर्माण झाली आहे, असंही नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची माफी, म्हणाले….

“समीर वानखेडे केंद्रीय तपास यंत्रणेचा पोपट, या पोपटावर कुठलीही कारवाई होणार नाही”

चंद्रकांत दादांनी चोंबडेपणा करू नये – संजय राऊत

‘कशाला तोंड उघडायला लावताय’; संजय राऊतांचा संभाजीराजेंवर हल्लाबोल

Hanuman Chalisa | राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी येणार आमने-सामने

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More