बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारत हिंमत हरलेला नाही, तुम्ही ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहात त्याची जाणीव आहे”

नवी दिल्ली | प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याच्या वाटपानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त नरेंद्र मोदी यांनी आज संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी बोलताना देशातीन जनतेला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्यासोबतच लसीबाबत माहिती दिली. कोरोनाशी लढण्यासाठी सरकार शक्य ते सगळे प्रयत्न करत आहे, असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

भारत अजूनही हिंमत हरलेला नाही, भारतवासी हिंमत हरणार नाहीत, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. यासोबतच नागरिकांना लस घेण्याचं आवाहनही केलं. लस घेतली तरीही मास्क वापरणं बंधनकारक आहे. लसीकरणाच्या मोहिमेत आत्तापर्यंत देशात आत्तापर्यंत 18 कोटी लोकांनी लस घेतल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

100 वर्षांनंतर अशी भयानक साथीच्या आजाराची परिस्थिती जगावर उद्भवली आहे. आपल्यासमोर एक अदृश्य शत्रू आहे. अनेक लोक या कोरोनाच्या संकटातून जात आहेत. लोक ज्या गंभीर परिस्थितीतून जात आहेत, त्याची जाणीव मला देखील आहे. जनतेचं दुःख मला समजतंय, त्यांच्या वेदना मलाही जाणवत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, पीएम किसान योजनेच्या अंतर्गत आज देशभरातील 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि काही खासदार या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उपस्थित होते.

 

 

थोडक्यात बातम्या-  

‘या’ खेळाडूचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; भारतीय संघांच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

“मी अमित शहा यांना 3 वेळा हरवलं”; प्रशांत किशोर यांचा दावा कितपत खरा?

‘जयंत पाटील हे तर…’; पाटलांच्या नाराजीवर अजित पवारांनी सोडलं मौन, म्हणाले….

कोरोनानं अख्खं गाव सुतकात; तरूणांनी केली कमाल अन् गावासाठी उभारलं कोविड सेंटर

देशाचा आक्रोश 56 इंची छातीला जाणवत नाही का? अमोल कोल्हेंचं कवितेतून परखड भाष्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More