बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बेअरस्टो, स्टोक्सनं आपल्या दमदार खेळीनं पळवला भारतीय संघाच्या तोंडचा विजयाचा घास

पुणे | दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंड संघातील फलंदाज बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या दमदार फलंजीच्या जोरावर 336 धावांचा भला मोठा डोंगर उभारलेल्या भारतीय संघाचा पराभव करत त्यांच्या तोंडचा विजय हिसकावुन घेतला. इग्लंडने 6 गडी आणि 39 चेंडू राखत भारताचा पराभव केला.

भारताच्या 337 धावांच्या पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो यांनी जबरदस्त सुरुवात केली. रोहित शर्माच्या जबरदस्त क्षेत्ररक्षणामुळे भारताला जेसन 55 धावांवर धावबाद झाला. मात्र त्यानंतर आलेल्या बेन स्टोक्सने बेयरस्टोच्या साथीने भारतीय गोलंदाजीतील पिसे काढलीत. दोघांनी झटपट धावा काढत संघाला 200 धावांच्या पलीकडे नेलं. मात्र स्टोक्स 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने आपल्या एका षटकात बेअरस्टो आणि बटरलला माघारी धाडत भारताला पुनरागमनाची संधी दिली.

शेवटी डेविड मलान आणि पदार्पणवीर लियाम लिविंगस्टोन यांनी संयमी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. डेविड मलान 16 धावांवर नाबाद राहिला. तर लियाम लिविंगस्टोन 27 धावांवर बिनबाद परतला. त्याआधी प्रथम फलंदाजी करताना राहुलने शतकी खेळी केली. 114 चेंडूत 108 धावा केल्या. या खेळीत त्यानं 7 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर पंतनेसुद्धा अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची खेळी केली. तर

अष्टपैलू हार्दिक पांड्यानेही छोटेखानी आक्रमक खेळी केली. चार षटकारांसह 16 चेंडूत 35 धावा ठोकल्या तर त्याचा बंधू क्रुणाल पांड्यानंही 12 धावांचं योगदान दिलं. मात्र भारतीय गोलंदाजांना लवकर बळी न घेता आल्यामुळे इंग्लंड संघाने इतक्या मोठ्या लक्ष्याचा सामना एकहाती जिंकला. त्यामुळे आता तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-1 अशी बरोबरी झाली असून दोन्ही संघासांठी अंतिम सामना ‘करो या मरो’ या स्थितीप्रमाणे आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

धक्कादायक! बापानेच केलं पोटच्या मुलीसोबत काळीमा फासणारं कृत्य, वाचून तूम्हीही व्हाल सुन्न

नाईट कर्फ्यूच नाही तर ‘या’ जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनचा निर्णय

“पुन्हा दिपाली चव्हाण होऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नक्की न्याय देतील”

जाणुन घ्या… पुण्यातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! ‘राज्यात रविवारपासून रात्रीची जमावबंदी’

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More