बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

#TokyoOlympics | हाॅकी सामन्यात भारताचा 3-0 ने दणदणीत विजय

टोकियो | कोरोना संकटानंतर अखेर टोकियो ऑलिम्पिकला धुमधडाक्यात सुरूवात झाली आहे. या टोकियो ऑलिम्पिकमध्ये मंगळवारी खेळवण्यात आलेल्या हाॅकी सामन्यात भारतीय संघाने कमाल केली. भारतीय संघाने स्पेनचा 3-0 अशा फरकाने पराभव करत अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या मानहाणीकारक पराभवानंतर त्यांनी आता मोठा विजय मिळवला आहे.

सामना सुरू झाल्यानंतर 8व्या मिनिटालाच भारतीय संघाला गोल करण्याची मोठी संधी मिळाली होती. पण सिमरणजीत याला हा गोल करता आला नाही. त्यानंतर त्यांनं आक्रमक पवित्रा घेत गोल करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर त्याला यश आलं. सिमरणजीतने 14 व्या मिनिटाला गोल दागत भारताला पहिला गोल करू दिला. त्यानंतर स्पेनच्या खेळाडूंनी आक्रमक खेळी केली.

स्पेनच्या आक्रमक खेळीमुळे भारताला पेनल्टी काॅर्नरच्या संधी उपलब्ध झाल्या. याचाच फायदा घेत भारताच्या रुपिंदरनं दुसरा गोल दागला आणि भारताला आणखी आघाडी मिळवून दिली. हाफ टाईमपर्यंत भारत 2-0 ने आघाडीवर होता. भारतीय संघाने स्पेनविरूद्ध संयमी खेळी केली. त्यानंतर रुपिंदर सिंहनं आणखी एक गोल करत भारताचा विजय जवळपास निश्चित केला.

दरम्यान, भारतीय पुरुष हॉकी संघाला दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून 1-7 असा मानहाणीकारक पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. त्यानंतर आता संघाने चांगली कामगिरी करत अंकतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

खासदार सुजय विखे पाटील यांना मोठा धक्का; ठाकरे सरकारची ‘ही’ मोठी कारवाई

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More