बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘भारत जातीवादाने नाही तर वर्णभेदानेही बाधित आहे’; मिलिंद सोमणची पत्नी अंकिता संतापली

नवी दिल्ली | भारताला टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईने चानूने रौप्य पदक मिळवून दिलं आहे. ईशान्य भारताची म्हणजे मणिपूरची असलेल्या मीराबाई चानूचं सर्व देशभरातून कौतूक होत आहे. 2021 च्या ऑलिम्पिकमध्ये भारताला पदकांचं खातं उघडून दिलं आहे. मात्र याचाच धागा पकडत मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिता कोनवारने जातीवाद आणि वर्णभेद या विषयावरून आवाज उठवण्याचा प्रयत्न केला आहे.

तुम्ही जर ईशान्य भारताचे लोक असाल आणि तुम्ही देशासाठी एखादं पदक जिंकाल तेव्हाच तुम्ही भारतीय होऊ शकता. नाहीतर तुम्ही चिंकी, चीनी, नेपाळी किंवा कोरोनाचा नवीन प्रकार म्हणून ओळखलं जाऊ शकता. भारत हा केवळ जातीवादाने नाहीतर वर्णभेदानेही बाधित आहे, असं अंकिता कोनवारने म्हटलं आहे.

अंकिता कोनवारने यासंदर्भात इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने या पोस्टमधून ईशान्य भारतामधील लोकांचा वर्णभेदावरून भेदभाव करणाऱ्या लोकांवरचा राग व्यक्त केला आहे. तिच्या या पोस्टला सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. अंकिता ही गुवाहाटीची रहिवासी आहे.

दरम्यान, याआधी ‘मेरी कोम’ या चित्रपटामध्ये सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करणारी मॉडेल लिन-लैशरामनेही या विषयावर भाष्य केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पुणे नगरसेवकांचा भोंगळ कारभार उघड, पालिकेच्या पैशांवर सुरू आहेत ‘ही’ कामे

हाच खरा बाहुबली! डोक्यावर दुचाकी उचलणाऱ्या तरूणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

दिलासादायक! मुंबईची वाटचाल कोरोनामुक्तीकडे, वाचा आजची आकडेवारी

‘एवढी सगळी लफडी केलीस पण मला कळू दिलं नाहीस’; शिल्पा शेट्टी राजवर भडकली

‘राज्यपालपदावर असताना राजकारणाची एवढीच खुमखुमी असेल तर…’; नाना पटोलेंची राज्यपालांवर टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More