बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना लसीकरणात भारताने अमेरिकेलाही टाकलं मागे; भारताचा लसीकरणात नवा उच्चांक

नवी दिल्ली | कोरोनाची वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच देशभरात लसीकरण मोहिमेला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्यात आली. त्यातच कोरोना लसीकरणात भारताने आता नवा विक्रम केल्याची माहिती समोर आली आहे.

भारताने कोरोना लसीकरणामध्ये अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रालाही मागे टाकल्याची माहिती समोर आली आहे. काल संध्याकाळपर्यंत भारतात एकूण 32 कोटी 36 लाख 63 हजार 297 नागरिकांना कोरोना लसी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात भारतात 17 लाख 21 हजार 268 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. देशात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना भारताने लसीकरणात नवा उच्चांक गाठल्याने भारताचं कौतुक करण्यात येत आहे. सध्या कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी धोका अजूनही टळलेला नाही, असं सरकारतर्फे सांगण्यात येत आहे.

सध्या देशभरात कोरोनाचा नवा विषाणू डेल्टा प्लस हा डोकं वर काढत असतानाच लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. प्रशासनासह सरकारतर्फे नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. सध्या महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण करण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या

देशाचे पंतप्रधानच ओबीसी आहेत, याहून मोठा सन्मान काय असेल- भाजप

सोन्याच्या वायदे बाजारात तेजी, चांदी देखील वाढली; वाचा ताजे दर

“गलवान खोऱ्यातील शहिदांना भारत विसरणार नाही, धमक्या देखील सहन करणार नाही”

काॅमेडी क्वीन विशाखा सुभेदारला राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

भारतात राष्ट्रपतींना खरंच शिक्षकांपेक्षाही कमी पगार मिळतोय?; हे वाचून कळेल वास्तव काय!

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More