बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ऑलिम्पिकमध्ये रंगणार भारत पाकिस्तान सामना; ‘या’ खेळाडूच्या खांद्यावर भारताची धूरा

टोकियो | क्रिकेट म्हणजे भारतात एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असेल तर ‘सोने पे सुहागा’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाहायची संधी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना क्वचितच मिळाली आहे. मात्र, आता भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिडाप्रेमींना मिळणार आहे. सध्या चालू असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारत विरूद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे.

ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरूवात चांगली झाली. भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने धडाकेबाज कामगिरी केली आहे. क्वालिफाइंग राऊंडमधून फायनल गाठण्यासाठी नीरजला 83.5 मीटरचं टार्गेट देण्यात आलं होतं. पण त्याने 86.65 मीटरवर भाला फेकून दाखवला. त्यामुळे आता त्याने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

भारताबरोबरच पाकिस्तानचे देखील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धा सहभागी झाले आहेत. परंतु पाकिस्तानच्या खात्यात एकही पदक गेलं नाही. त्यातच आता पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीमने क्वालिफाइंग राऊंडमध्ये दमदार कामगिरी करत फायनलमध्ये स्थान मिळवलं आहे. त्याने क्वालिफाइंग राऊंडमध्ये 85.16 मीटर भाला फेकला. त्यानंतर त्याचं फायनलमध्ये स्थान निश्चित झालं आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ फायनलमध्ये असल्यानं आता सामन्याची चुरस वाढली आहे. 7 ऑगस्टला हा सामना खेळला जाणार आहे. नीरजसोबतच भारताचा आणखी एक भालाफेकपट्टू शिवपाल यादव याच्याकडून देखील भारताला पदकाची अपेक्षा आहे. याआधी आशियाई स्पर्धेत हे दोन खेळाडू आमने सामने आले होते.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! अन् पूराच्या पाण्यात चक्क ब्रिज वाहून गेला, पाहा व्हिडीओ

भारतीय कुस्तीपटूंचा निर्णायक डाव; दीपक पुनिया आणि रवी दहिया सेमीफायनलमध्ये दाखल

MPSCच्या उमेदवारांसाठी मोठी बातमी; अखेर परीक्षेची तारीख ठरली

करदात्यांना सरकारचा दिलासा; केली ‘ही’ घोषणा

अश्लील चित्रपट निर्मिती प्रकरणी गहना वशिष्टला कोर्टाकडून आणखी एक झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More