क्रिकेटप्रेमींनो ‘या’ दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान हायव्होल्टेज लढत

IND vs PAK l T20 विश्वचषक 2024 ही स्पर्धा 2 जूनपासून सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या शानदार सामन्याची चाहत्यांना प्रतीक्षा आहे. T20 विश्वचषक अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयोजित केली जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महान सामना न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

भारत – पाकिस्तान सामना कधी आहे? :

नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम स्पर्धेसाठी सज्ज आहे. या स्टेडियमचे नुकतेच लोकार्पण करण्यात आले आहे. हे स्टेडियम टीम इंडियासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. हे स्टेडियम टीम इंडियासाठी होम ग्राउंड म्हणून काम करू शकते. यासंदर्भात आयसीसीने म्हटले आहे की, न्यूयॉर्कमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यासाठी वापरण्यात येणारे ठिकाण मुंबईच्या वानखेडे स्टेडियमसारखेच असेल. वानखेडेच्या आकाराचे स्टेडियम टीम इंडियाला घरच्या मैदानाची अनुभूती देऊ शकते.

टी-20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे, परंतु टीम इंडिया 5 जून बुधवारपासून आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. टीम इंडिया पहिला सामना आयर्लंड आणि दुसरा पाकिस्तानविरुद्ध खेळणार आहे. स्पर्धेतील गट-अ मध्ये असलेली टीम इंडिया आपले पहिले दोन सामने न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळणार आहे. या स्टेडियमची क्षमता 34,000 प्रेक्षकांची असणार आहे.

IND vs PAK l गेल्या टी-20 विश्वचषकातील भारत-पाक सामना झाला रोमांचक :

सर्वात महत्वाची गोष्ट ही आहे की, 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळवण्यात आलेला सामना खूपच रोमांचक झाला होता. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर या दोघांमध्ये जबरदस्त सामना रंगला होता. या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 159 धावा केल्या होत्या.

प्रत्युत्तरात टीम इंडियाने लक्ष्याचा पाठलाग करताना 6.1 षटकांत 4 गडी गमावून 31 धावा केल्या. मग इथून विराट कोहलीने चमत्कार करून भारताला विजयाकडे नेले. हार्दिक पांड्याने कोहलीला चांगली साथ दिली होती. कोहलीने 53 चेंडूत 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82* धावांची खेळी केली होती.

News Title – India-Pakistan T20 World Cup match 

महत्त्वाच्या बातम्या

मतदानाच्या आकडेवारीने आढळरावांचं टेंशन वाढवलं; कोल्हेंना फायदा होणार?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

मौलवी उपचाराच्या नावाखाली करत होता बलात्कार, महिलेचा धक्कादायक दावा

ऐश्वर्या रायचा अपघात, अशा परिस्थितीत दिसल्याने बॅालिवूडमध्ये खळबळ

कमी किमतीत खरेदी करा 6 एअरबॅग असलेल्या आकर्षक कार