नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे- राज ठाकरे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यापासून भारत मुक्त झाला पाहिजे, असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

मी कोणाकडे जागा मागायला गेलो नाही, मला लोकसभा निवडणूक लढवण्यात काहीही रस नाही, असंही ते यावेळी म्हणाले.

माझ्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कोण? हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. मोदीविरोध हिच माझी भूमिका आहे. जे काही करायचं ते मोदी आणि भाजपच्या विरोधात करायचं, असं आवानही त्यांनी मनसैनिकांना केलं.

दरम्यान, भाजपकडून चौकीदार मोहीम राबवली जाते आहे. ही निवडणूक भारताची आहे की नेपाळची? असा प्रश्नही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या-

-अजय देवगण स्काॅर्डन लीडर ‘कर्णिक’ च्या भूमिकेत

-‘धनुदादा’ ही हाक आता ऐकायला मिळत नाही, धनंजय मुंडेंचे भावूक वक्तव्य

-डाॅ. अमोल कोल्हे यांना दिलासा, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका सुरूच राहणार

-“अजून पाच ते सहा दिग्गज नेते आणि त्यांची मुलं भाजपच्या वाटेवर”

-महाराष्ट्रात प्रितम मुंडे आणि पूनम महाजनांचं नाव निश्चित?