खेळ

आज दुसरा टी-20 सामना; भारतासमोर दुहेरी आव्हान!

राजकोट |  नवी दिल्लीतील प्रदूषित वातावरणात पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर गुरुवारी राजकोटवर रंगणाऱ्या दुसऱ्या ट्वेन्टी-20 क्रिकेट सामन्यात भारतीय संघापुढे दुहेरी आव्हान असणार आहे. राजकोटमध्ये चक्रीवादळाची शक्यता असल्यानं यावेळीसुद्धा आव्हानात्मक परिस्थितीतच भारताला मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी बांगलादेशला नमवून तीम सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधवी लागणार आहे.

भारताच्या वेगवान माऱ्यात अनुभवाचा अभाव आहे. याचाच फटका भारताला पहिल्या लढतीत बसला. खलिल अहमद, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर दडपणाखाली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे दुसऱ्या लढतीत संघात बदल होण्याची शक्यता बळावली आहे.

भारताच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी मागील सामन्यात नांगी टाकली. लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, कृणाल पंडय़ा आणि शिवम स्थान बळकट करण्यासाठी उत्सुक आहेत. मुंबईकर शिवमला पदार्पणात छाप पाडता आली नाही. परंतु गरजेवेळी मोठे फटके मारून सामन्याचं रूप पालटण्याची क्षमता त्याच्याकडं आहे.

दमदार गोलंदाजीच्या बळावर बांगलादेशने भारताला सात गडी राखून भारताविरुद्ध ट्वेन्टी-20 सामन्यांत  पहिलाच विजय मिळवला. भारतीय संघ आजच्या सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या