बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारताला मिळणार चौथी लस; ‘या’ लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. कोरोनावर उपाय म्हणून लसीकरण हाच एक प्रभावी उपाय आहे. जानेवारी पासून भारतात लसीकरणाला सुरवात झाली आहे. आता सध्या लसीकरणाचा चौथा टप्पा पार पडत आहे. लसीकरणात लोकांचा सहभाग वाढल्यानं लसीचा तुटवडा जाणवत आहे.

कोरोना नियंत्रणासाठी लसीकरण उत्तम उपाय असल्यानं त्यावरच अधिकाधिक भर दिला जात आहे. भारतीयांसाठी दिलासादायक बाब म्हणजे भारताला चौथी लस मिळणार आहे. फायझरची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, भारतात लवकरच या लसीला मंजुरी मिळेल, अशी माहिती फायझर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला यांनी दिली आहे.

कोरोना लसीकरणाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने रशियाच्या स्पुटनिक-व्ही लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली होती. आता त्यानंतर अमेरिकन कंपनी फायझरच्या लसीला भारतात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. फायझर कंपनीचे सीईओ अल्बर्ट बोरला यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

दरम्यान, कंपनी लवकरच सरकारशी अंतिम करार करेल, अशी अपेक्षा आहे, असं बोरला यांनी म्हटलं आहे. भारतात आगामी काळात फायझर आणि मॉडर्ना लसीला मान्यता देण्याबाबत सरकार विचार करत असल्याचंही ते म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्याः-

ज्या दिवशी हे सरकार पडेल त्या दिवशी आम्ही…- देवेंद्र फडणवीस

मीरा-भाईंदरमध्ये भाजपला मोठा धक्का; 39 नगरसेवक राजीनाम्याच्या तयारीत?

“कोणी कोणाचं ऐकायचं नाही, हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“आपणच बॉस असून पवारांना फाट्यावर मारतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं”

दिलासादायक! महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणत घट, वाचा आजची आकडेवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More