बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर भारतामुळे आशिया कप पुढं ढकलला जाईल”

लाहोर |  भारतात यावर्षी जूनमध्ये होणारा आशिया चषक पुढे ढकलला जाऊ शकतो, असं भकित पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रमुख एहसान मणी यांनी वर्तवलं आहे. भारत वर्ल्ड कसो़टी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला तर आशिया चषक पुढे ढकलण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय उरणार नाही. खरंतर, आशिया चषक गेल्या वर्षी खेळवला जाणार होता, परंतु कोरोनामुळे सर्वच स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता विश्व कसोटी चॅम्पियनशिपची फायनल जूनमध्ये होणार आहे.

श्रीलंकेने जूनमध्ये आशिया चषक खेळु शकतो असं सांगितलं आहे. मात्र आशिया कप आणि विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या तारखा एकत्र आल्यामुळे आशिया चषक 2023 पर्यंत पुढे ढकलला जाऊ शकतो, असंही मणी यांनी सांगतिल आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे सीईओ वसीम खान यांनी सुद्धा असंच वक्तव्य केलं आहे. भारत विश्व कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचल्याचं दिसत आहे. अंतिम फेरीत भारताचा सामना न्यूझीलंडशी होई त्यामुळे आशिया चषक पुढे ढकलल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असं वसीम खान यांनी सांगितलं.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसीला भारतात आगामी टी-20 विश्वचषक संदर्भात पत्रही लिहिलं आहे. आमच्या चाहत्यांना, पत्रकारांना आणि खेळाडूंना व्हिसा मिळावा यासाठी पाकिस्तानने लेखी हमीची मागणी केली आहे. जर भारत याची हमी देत ​​नसेल तर टी -20 विश्वचषक दुसरीकडे खेळवण्यात यावा, अशी मागणीही एहसान मणी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून चालू पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी केला राज ठाकरेंना नमस्कार

“संजय राठोडांचा राजीनामा घेतला म्हणजे महाराष्ट्रावर उपकार केले नाही”

पूजाच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, केली ‘ही’ विनंती

“संजय राठोडांनी माझ्याकडे राजीनामा दिला पण विरोधकांनी गलिच्छ राजकारण सुरू केलं”

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर नारायण राणे म्हणाले…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More