भारताच्या मनाचा मोठेपणा, ११ पाकिस्तानी कैद्यांची सुटका होणार

नवी दिल्ली | भारताने आपल्या मनाचा मोठेपणा दाखवत ११ पाकिस्तानी कैद्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतलाय. आज या सर्व कैद्यांची सुटका केली जाणार आहे.

कझाकिस्तानची राजधानी अस्तानामध्ये पार पडलेल्या शांघाई को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, शिक्षा पूर्ण झाल्याने भारत या कैद्यांची सुटका करत असल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या